vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री गजानन महाराज पालखीचे जालना महानगरपालिकेतर्फे भक्तिभावाने स्वागत महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची उपस्थिती; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

श्री गजानन महाराज पालखीचे जालना महानगरपालिकेतर्फे भक्तिभावाने स्वागत महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची उपस्थिती; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

जालना | प्रतिनिधी-पंढरपूर येथील आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून शेगावकडे मार्गस्थ झालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे रविवारी जालना शहरात आगमन झाले. पालखी शहरात दाखल होताच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जालना महानगरपालिकेच्या वतीने पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच श्रींच्या चरणी नतमस्तक होत शहरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी शेगावच्या दिशेने रवाना होते. या प्रवासादरम्यान पालखी जालना शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनाची माहिती मिळताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ‘गण गण गणात बोते’, ‘गजानन महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन गजानन महाराज च्या दिंडीचे स्वागत जालना शहर महापालिका च्या वतीने करण्यात आले यावेळी महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत सहायक कार्यालयीन अध्यक्ष रंजना दांडेकर सह आयुक्त विजय फुलंब्रीकर विद्युत अभियंता कोमल गावंडे अरुण वानखेडे श्रावण सराटे महानगरपालिका प्रशासनाची उपस्थितीपालखी स्वागतप्रसंगी महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये कार्यालय अधीक्षक रंजना दांडेकर, सहायक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर, विद्युत अभियंता कोमल गावंडे, निरीक्षक अरुण वानखेडे, श्रावण सराटे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम केले.भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरणश्री गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमन होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अनेक भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण केले. भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.

जालना शहरातून शेगावकडे मार्गस्थ होणाऱ्या या पालखी सोहळ्यामुळे शहरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. 🚩🙏

00000

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….