vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

 आध्यात्मिक वार्ता-

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो, यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे ८ किंवा १० दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये देखील तृतीया वृद्धीतिथी होती आणि नवरात्र 10 दिवसांचे होते. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज एक याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात मात्र काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करावा. तसे करणे ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा.

                                                                                                                                                नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. वयोमाना मुळे सुद्धा असे कमी करता येईल.

                                                                                                                                                                                          नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करुन नेहमी प्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर / टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी.

यावर्षीच्या नवरात्रातील काही प्रमुख दिवस -ललिता पंचमी :- 26 सप्टेंबर, शुक्रवारीमहालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) :- 29 सप्टेंबर, सोमवारी दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास :- 30 सप्टेंबर, मंगळवारी महानवमी, नवरात्रोत्थापन :- 1 ऑक्टोबर, बुधवारी विजयादशमी (दसरा) :- 2 ऑक्टोबर, गुरुवारी (विजय मुहूर्त – दुपारी २:२७ ते ३:१५)नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो. ( दाते पंचांगानुसार माहिती )

000000

संबंधित पोस्ट

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम…

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन