vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई प्रतिनिधी-

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यू तोतलाडोह गावाचे विस्थापन झाले. वाडंबा येथे विस्थापित झालेल्या या गावाला कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. आर्थिक मोबदला घेऊन त्यांना फक्त जमिनी दिल्या आहेत. कायद्यानुसार त्यांना सुविधा देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

सांगली जिल्ह्यातील कणेगाव या पूर बाधित गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कालबद्ध कार्यक्रम आखून मार्गी लावावा. गावठाणातील जुन्या जागेचा रहिवासी वापर करता येणार नाही या अटींवर जागेची मालकी मूळ मालकाकडे ठेवण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव द्यावा. ज्यांनी पैसे भरले आहेत व स्थलांतरासाठी तयार आहेत त्यांना जागा वाटपाचे काम एक महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय व्याख्यानमाला

vishwatmaklokswamivarta

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप (SMART) सोलार योजना