vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्‍वाभिमान योजने अंतर्गत कन्नड तालुक्‍यातील ६० लाभार्थ्‍यांना सोडत पद्धतीने एकुण ९१ हे ०१ आर (२१२ एकर २६ गुंठे) जमीन वाटप करण्‍यात आली.

कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील दालनात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाठ, वरिष्ठ समाज कल्‍याण निरीक्षक श्रीमती सीमा सिंदीकर यांच्‍या उपस्थितीत नीदा नवीद खान वय ५ वर्ष या मुलीच्‍या हस्‍ते सोडत काढण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत मागासवर्गीय संवर्गातील भुमिहिन शेतमजूरांना ही जमिन शेतीसाठी १०० टक्‍के अनुदानावर देण्‍यात येते. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्ररेषेखालील भुमिहिन कुटूंब सन २०२१-२०२२ पासुन लाभ मिळण्‍याच्‍या प्रतिक्षेत होते. त्यासाठी समाज कल्‍याण विभागाने सन २०२२-२३, २०२३-२४ व चालु वर्षात जमीन खरेदी करुन लाभार्थ्‍यांना लाभ देण्यात आला. याकामी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी आज कन्नड उपविभागीय कार्यालयात सोडत पद्धतीने चिठ्या काढुन मौ.माळेगांव लोखंडी, माळेगांव ठोकळ, वासडी, पळशी बु, नादरपुर व गौरपिंपरी या ठिकाणच्‍या जमीनी प्रति लाभार्थी चार एकर (कोरडवाहु) प्रमाणे निवड करण्‍यात आली. या ६० लाभार्थ्‍यांच्‍या जमिन मालकीच्या आदेशासाठी जिल्‍हाधिकारी अध्‍यक्ष जिल्‍हास्‍तरीय समितीकडे अंतीम मंजुरीसाठी सादर करण्‍यात येईल. जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या आदेशान्‍वये या लाभार्थ्‍यांना सातबारा उतारा मिळेल.

महसुल सहाय्यक जीवन चव्‍हाण, समन्वयक अभिजित पानट, मंडळ अधिकारी विकास वाघ, तलाठी संगीता सुर्यवंशी, तलाठी एस. ए. बावस्कर, शिरस्‍तेदार आनंद शिंदे, तलाठी एस.डी.विसपुते, ग्राम विकास अधिकारी के एस थोरात, ग्रामसेवक एस. एस. गोसावी आदींनी परिश्रम घेतले यावेळी लाभार्थी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा…

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर