vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

बुलडाणा, प्रतिनिधी : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश इच्छुक दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन सतगुरू श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगांवचे प्राचार्य व्हि.व्हि. काळे यांनी केले आहे.

दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी Admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन पदधतीने अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवुन झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित करावा. त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येते. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसायाची माहीती देण्यात येते.

सतगुरू श्री अगाशे काका औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव या संस्थेमध्ये एकुण 20 व्यवसाय प्रवेशाकरीता उपलब्ध असुन प्रवेशाकरीता एकुण 680 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली असुन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना लागु करण्यात आलेली आहे. आयटीआयतुन व्यावसायीक शिक्षण पुर्ण करून त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

 

0000

संबंधित पोस्ट

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्यापायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta