vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटनमहिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर

रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटनमहिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महिलांनी रजोनिवृत्ती व पीसीओडीसंदर्भातील आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच आरोग्य यंत्रणेने याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्यसेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

 महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

  आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. आशीष भारती, डॉ. कांचन वानोरे, डॉ. आशिष भारती, डॉ. दयानंद मोतीपवळे, डॉ. प्रशांत हिंगणकर (युनिसेफ), डॉ. मंगेश गढरी (युनिसेफ), डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. संतोष कडले, डॉ. सुरेश रावते, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

 कार्यशाळेत रजोनिवृत्ती व्यवस्थापन, पीसीओडीचे निदान व उपचार, समुपदेशन, आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक व शारीरिक आरोग्य, आधुनिक उपचारपद्धती आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चर्चासत्र आणि प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञान व कौशल्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे पीसीओएसचे प्रमाण वाढत असून वेळेत निदान, योग्य समुपदेशन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा विकार प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो

महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि रजोनिवृत्ती तसेच पीसीओडीग्रस्त महिलांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0000000

संबंधित पोस्ट

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा लाभ घ्या- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम- अभियानात दिनांक 20 सप्टेंबरअखेर 3 हजार 148 रूग्णांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “सिकलसेल जनजागृती पंधरवडा”दि. १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुष्ठरोग जनजागृतीसाठी विविध उपक्रमासह शिबीरांचे आयोजन

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत निपाणा ग्रामसभेत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ संकल्प…

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta