vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे. आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते झाले.

या महोत्सवात गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या स्थानिक आंबा वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. कोयतूर, बीईओ, विशाखा स्थानिक, रसराज यासह विविध स्थानिक वाण प्रदर्शनात मांडण्यात आले. प्रदर्शनातून उत्कृष्ट वाणांची निवड करून त्यांचे संशोधन, संवर्धन व पुढील प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात आंबा लागवडीस मोठी संधी आहे. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंबा लागवडीला चालना द्यावी.

कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा प्रकल्प संचालक, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संशोधक, विषय विशेषज्ञ तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 साठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 जुलै 2025

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta