vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नालेसफाईची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत -आयुक्त सौरभराव आयुक्तांनी घेतला प्रभागसमितीनिहाय नालेसफाई कामाचा आढावा*

नालेसफाईची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत -आयुक्त सौरभराव आयुक्तांनी घेतला प्रभागसमितीनिहाय नालेसफाई कामाचा आढावा*

 

ठाणे प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे पूर्ण करत असताना कामाचा दर्जा, कामाची गती आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, नालेसफाईची उर्वरित कामे 5 जूनपर्यत युध्दपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करुन आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

    ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा प्रभागसमिती निहाय आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीस उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सर्व प्रभागसमितीचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

   ज्या परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत, किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा, त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.

 तसेच ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहेत, जेथे दरवर्षी पाणी साचते, अशा ठिकाणी जवळपास 102 पंप बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तात्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावे, शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या

   नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कल्व्हर्ट, नाले, खाडीमुख आउटलेट्सची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

     नालेसफाईची कामांचा दैनंदिन आढावा घेवून केलेल्या कामाचा तपशील ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून 5 जूनपर्यत समाधानकारक काम झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी सर्व संबंधितांना बैठकीत दिले.

00000

संबंधित पोस्ट

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता दिंडी सोहळ्यात विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छतेचाही जागर

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta