vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) आणि दाखलपूर्व प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात १८ जुलै २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून संबंधित पक्षकार, बँका, वित्तीय संस्था तसेच विधिज्ञांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या विशेष संधीचा लाभ घेऊन तडजोडीद्वारे वाद मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. एस. बी. कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणे तसेच त्यासंदर्भातील दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.

प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी संबंधित पक्षकारांनी आपले प्रकरण ज्या न्यायालयात सुरू आहे तेथे अर्ज सादर करावेत. तसेच दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावेत, असेही कळविण्यात आले आहे.#विशेषलोकअदालत #LokAdalat2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar

0000

संबंधित पोस्ट

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

vishwatmaklokswamivarta

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

vishwatmaklokswamivarta

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली