vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

 उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

राज्य प्रतिनिधी-माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात आज विविध विभागांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी घेतली

मुंबईत दृश्यमान स्वरूपात स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points-GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. या अंतर्गत बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर, कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणी (Garbage Vulnerable Points-GVP’s) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी केली जात आहे. तसेच, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.

शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठ आदी परिसरातील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ सुलभ करावेत. अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करावे तसेच अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितित अधिकृत करु नयेत. प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीस (बॉटलनेक) कारणीभूत बाबींवर उपाययोजना कराव्यात. तसेच, महानगरपालिकेच्या ‘मार्ग’ अॅपवर प्राप्त तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावेत, असे निर्देश देखील श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड हवामान अपडेट | IMD ५ दिवसांचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता….

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म,विधानपरिषदेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर