vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*

मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*

मुंबई प्रतिनिधी – बुधवारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी “भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाची नव्हे, तर आपलीच अवलाद आहेत,” असे वक्तव्य करत धार्मिक भावना न भडकवण्याचे आवाहन केले.

मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील काही गृहसंकुलांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बकऱ्या आणण्यास व त्यांची कुर्बानी देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला होता. या वादामुळे मीरा रोड, घाटकोपर, गोरेगाव यांसारख्या भागांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारमधील मंत्री आणि ‘रिपाई’चे (RPI-A) प्रमुख ना. रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत मीरा रोड येथील वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना.रामदास आठवले यांनी अत्यंत परखड मत मांडले. “मुस्लिम समाजाने जर सणासाठी बकऱ्या आणल्या असतील, तर त्याला लगेच विरोध करण्याची गरज नाही. मुघल भारतात येण्यापूर्वी येथील मुस्लिम बांधव हे हिंदूच होते. मुघल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलीच (हिंदूंची) अवलाद आहेत, अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र राहत होते. आता राजकीय फायद्यासाठी कोणीही धार्मिक भावना भडकवू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा इतर कोणी, अशा पद्धतीने कोणालाही विरोध केला जाऊ नये. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

00000

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी १५० कोटी निधी वितरित; बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची भेट

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉