vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमआयडीसीतील विकास कामांचा डिपीआर तयार करावा – पालकमंत्री पंकजा मुंडे  

एमआयडीसीतील विकास कामांचा डिपीआर तयार करावा – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना, द प्रतिनिधी): जालना शहरातील एमआयडीसी परिसराचा (औद्योगिक वसाहत) सर्वांगिण विकासाकरीता डिपीआर तयार करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक, सौ.सुषमा नगरदेवळेकर, सहाय्यक अभियंता मस्तान शहा, प्रमुख भूमापक रमेश डोईफोडे आणि उद्योजकांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जालना येथील औद्यागिक वसाहतीमध्ये अनेक मोठ्या औद्योगिक संस्था कार्यरत आहेत. परंतू याठिकाणी आवश्यक रस्ते, पार्किंग, सुरळीत वीज पुरवठा आदी सुविधा नाहीत. याकरीता औद्योगिक वसाहतीत विविध विकास कामे व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीने लवकरात लवकर डीपीआर तयार करावा. एमआयडीसीच्या 4 थ्या फेजकरीता जागा पाहून प्रस्ताव सादर करावा. लवकरच याबाबत उद्योग विभागात बैठक लावून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.

यावेळी उद्योजकांच्या संघटनेने औद्यागिक वसाहतीतील रस्ते, स्ट्रीट लाईट, ट्रक पार्कींग, ड्रेनेज व्यवस्था, जुना बायपास रस्ता, सीटी बस सुरु करणे, मल्टीपार्क बाबत, बायपासच्या टप्पा-3 जवळ उड्डानपुल आदी मागण्या सादर केल्या.

*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर

एफएसएसएआयने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन.एफएसएसएआयने फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी..

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन