vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सीकत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश..

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सीकत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्राण्यांचे अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात चेकपोस्ट तयार करावेत ,या चेक पोस्टवर भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी दिले. पोलीस विभाग, पशुसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, परिवहन, महसूल आणि महानगरपालिका विभागाच्या अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त कार्यवाही करावी, तसेच शासन मान्यताप्राप्त कत्तलखान्यामध्ये अचानक भेट देऊन तेथील कामकाज, स्वच्छता व इतर बाबी विषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती’च्या (SPCA) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस  मा.न्यायधीश( परिविक्षाधीन) गायत्री रांझे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम अतिरिक्त पोलिस आयुक्त, अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक, एस. व्ही शहाणे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार कुंथले, उप शिक्षणाधिकारीश्रीमती गीता तांदळे, डॉ .रमण इंगळे, सहायक आयुक्त पशुसंवर्धनडॉ.अहेमद असरार,सहायक आयुक्त पशुसंवर्धन ,डॉ. शाहेद ,मुख्य पशुसंवर्धन अधिकारी महानगर पालिकाडॉ. ज्ञानेश्वर बिडाईत सहायक पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद,डॉ जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी महानगर पालिका यांची उपस्थिती होती.

 बाजाराच्या ठिकाणी किंवा इतरत्र होणारी प्राण्यांची अवैध केलेली वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तपासणी नाके (Check posts) अधिक सतर्क करण्यात यावीत.शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी वनविभाग व प्राणी मित्र संघटनांच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, सन 2026-27 साठी एकूण 751 कोटी 8 लाखांचा प्रारूप आराखडा मान्य- उद्या राज्यस्तरीय बैठकीत आराखडा सादर होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा #शपथविधी गुरुवार, १४ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे.

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्णआधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.