vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

आरोग्य प्रतिनिधी पुणे-संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.

या हिरकणीकक्षाअंतर्गत २ वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरामध्ये राजगिरा, शेंगदाणा, मुरमुऱ्याचे लाडु फुटाणे, फळे, बिस्किट, ओरआरएस, ग्लुकॉन डी, खाऊ ठेवण्यासाठी बरण्या, कागदी डिश आदी, खेळणी संचामध्ये बॅट बॉल. खुळखुळा. बाहुली. मोठा बॉल व लहान मुलांची इतर आवश्यक खेळणी आदी, गरोदर व स्तनदा मातांना अल्हाददायी वातावरणासाठी बेड, गाद्या, बेडशीट. उश्या. उशीचे कव्हर, पार्टिशन साठी मोठे पडदे आणि नॅपकीन, प्रथमोपचार पेटी, पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व सॅनेटरी पॅड या सुविधा आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांना हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खंडागळे यांनी केले आहे.#हिरकणीकक्ष #पालखी #वारी #माताबालआरोग्य #पुणे #सुरक्षितवारी

संबंधित पोस्ट

महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरूमहिलांच्या हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध

कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवा – मिन्नू पी.एम.• 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत होणार घरोघरी सर्वेक्षण• समाजात जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य अधिकाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण; ठाणे जिल्ह्यात हृदयविकारग्रस्तांना जीवनदान देण्याचा संकल्प…

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभहत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta