vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा-दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टेट पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी शुल्काच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. समितीने अन्य राज्यांमधील पीयूसी तपासणीचे प्रचलित दर तसेच विविध बाबींचा अभ्यास करून दरवाढीबाबत अहवाल सादर केला होता.

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांसाठी पीयूसी तपासणी शुल्क ५० रुपयांवरून ६० रुपये, पेट्रोलवरील तिनचाकी वाहनांसाठी १०० रुपयांवरून १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १२५ रुपयांवरून १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात आले आहे.

सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सुधारित दरांची अंमलबजावणी सर्व पीयूसी केंद्रांवर होत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, विहित दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी वायुवेग पथकांनाही आवश्यक सूचना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…