vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

संबंधित पोस्ट

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत- मंत्री नितेश राणे

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.