vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन

गणेशोत्सव उत्साहात साजरा करा पण, नियम जाणून घ्या ; काय करावे आणि काय करू नये?

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे. 

vishwatmaklokswamivarta

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

vishwatmaklokswamivarta