vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या खरीप हंगामात एल-निनो (El-Nino) च्या प्रभावामुळे सरासरी पावसाच्या तुलनेत ७ ते ८ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाजाचा विचार करता, शेतकऱ्यांनी मान्सूनच्या सुरुवातीच्या पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर लगेचच पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत परिसरात किमान ७५ ते १०० मि.मी. इतका समाधानकारक पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान ६ ते ७ इंच खोलपर्यंत पुरेशी ओल जात नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कमी पावसावर केलेली पेरणी उगवण क्षमतेवर परिणाम करते आणि पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

कृषी विभागाने यंदाच्या हंगामात खालील गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे, ज्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने करावा. शेतकऱ्यांनी जमिनीच्या उताराला आडवी पेरणी करावी, ज्यामुळे मातीची धूप थांबेल आणि पाणी जमिनीत जिरेल तसेच शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करून पेरणी करावी. कमी पावसाच्या परिस्थितीत सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहत असल्यामुळे पाऊस लांबला तरी पिके सुकत नाहीत. जास्त पाऊस झाल्यास सऱ्यांमधून जास्तीचे पाणी पिकाला इजा न पोहोचवता सुरक्षितपणे बाहेर निघून जाते. सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हे वरदान मानले जाते. यामुळे कमी पावसात ओलावा टिकून राहतो आणि अति पावसात पाण्याचा निचरा होतो. पाणी टंचाई परिस्थितीत फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी झाडांच्या मुळांभोवती जैविक आच्छादन (Mulching) करणे, ‘अँटी-ट्रान्सपिरंट’ (बाष्पीभवन रोखणारी) औषधांची फवारणी करणे आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी कुंपण घालणे तसेच उपलब्ध पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी ठिबक (Drip) आणि तुषार (Sprinkler) सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबक व तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी महाडीबीटी व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजने अंतर्गत अर्ज करावेत.

    एप्रिल ते जून दरम्यान शेततळे तयार करावेत पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते शेतातीलच एका भागात खोदलेल्या तलावात साठवले जाईल.पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्यास (Dry Spell) किंवा ऐन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (उदा. फुलोरा किंवा शेंगा धरताना) या साठवलेल्या पाण्यातून पिकांना जीवदान देणारे पाणी (संरक्षित सिंचन) देता येते. शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून जमिनीच्या सुपीकता निर्देशांकावर आधारित (Soil Health Card नुसार) खतांचा योग्य वापर करावा. तसेच नैसर्गिक निविष्ठा गांडूळ खत, जीवामृत आणि घनजीवामृत,जिवाणू खते यांचा पर्यायी खते म्हणून वापर करावा.जेणेकरून शेतकऱ्यांची पैशाची बचत होऊन जमीन आरोग्य सुधारेल. जेव्हा पावसाची अनिश्चितता असते, तेव्हा एकाच एका पिकावर अवलंबून राहणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच ‘आंतरपीक पद्धती’ (Intercropping) अवलंब करावा जसे सोयाबीन + तूर ,कापूस +मुग इत्यादि. त्यामुळे शेतकऱ्यांचे एका पिकावर अवलंबत्व राहणार नाही व आर्थिक नुकसान होणार नाही .

    वरील बाबींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

000000

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta