vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

   बुलढाणा प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

ढासाळवाडी येथे 690 पशुधन व 1 हजार 510 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 35 हजार 900 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम…

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*