vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

बुलढाणा प्रतिनिधी: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ मे २०२६ रोजी, शुक्रवार पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह तथा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बुलढाणा येथे सकाळी १० वाजल्यापासून आयोजित करण्यात आला असून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

या मेळाव्यात Mahindra & Mahindra तसेच Shinenumeru Nirman Pvt. Ltd. या नामांकित कंपन्यांनी त्यांच्या रिक्त पदांची अधिसूचना दिली आहे. मेळाव्यात कंपनी प्रतिनिधींकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

१० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २२ मे रोजी सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून नोंदणी करावी आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत मुलाखत द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे, सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२३४२ वर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

vishwatmaklokswamivarta

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026-मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रंगीत तालीम..

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*