vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये ‘राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, ती आपल्या कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली आहे. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता, आपल्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव प्रत्येकासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरू शकतो. याच उद्देशाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. तसेच येत्या २३ ऑगस्ट रोजी मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे

कार्यशाळेत भाग घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत. प्रवेश शुल्क ३०० रुपये असून सर्व सहभागींना मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येणार असून सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

यावर्षी राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रसोबत देशभरात व जगभरात विविध ठिकाणी जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करतात, त्यांनादेखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, त्यांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून, त्यांच्या उपक्रमांना भरघोस बक्षीसांच्या स्वरूपात प्रोत्साहनदेखील लाभणार आहे.

डिजिटल युगात माणसाला मातीशी जोडणारा उपक्रम,आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रिनवर व्यस्त राहणाऱ्या हातांना थेट मातीचा स्पर्श व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद मिळावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक उत्सवाबद्दल जनजागृती घडवून आणली जाणार आहे.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रदर्शन हॉल, पहिला मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे २३ ऑगस्ट २०२६ रोजी ही कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्यासाठी 8779584224 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पु.ल.देशपांडे कला अकादमी, मुंबई यांचेकडून करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या ९ रूपांचीही पूजा,देवीची नऊ प्रकारचे विशेष नैवेद्य ..

vishwatmaklokswamivarta

अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर· जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र· दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार