vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

*पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

सातारा, प्रतिनिधी- इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडुन राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 38 हजार प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

 या योजनेंतर्गत बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज 17 ऑगस्ट पर्यत hmas.mahait.org वर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्यान,सातारा यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे