vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

 जालना प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील जालना येथील जेईएस कॉलेज आणि बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमधील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या दोन परीक्षा उपकेंद्रावर नीट-पीजी 2025 परीक्षेचे दि.3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 12.30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा उपकेंद्र परिसरात 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक दुरध्वनी, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. आदेश दि.3 ऑगस्ट 2025रोजी सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन