vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नियोजनाचामहिला व बाल विकास मंत्री कु तटकरे यांनी घेतला आढावा..

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नियोजनाचामहिला व बाल विकास मंत्री कु तटकरे यांनी घेतला आढावा..

रायगड ( प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या स्मृतिदिन कार्यक्रमास दि.12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज महाड येथे आयोजित बैठकीत घेतला.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अभिजीत शिवतरे, पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री राजेश दिवेकर, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. रघुजीराजे आंग्रे, कार्यवाहक श्री. सुधीर थोरात, महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य आणि विविध विभागाचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु तटकरे यांनी प्रशासन, पोलीस, पुरातत्व विभाग तसेच स्थानिक समित्या यांनी परस्पर समन्वयाने कार्यक्रमाचे दिमाखदार नियोजन करावे असे निर्देश दिले. एप्रिल महिन्या असलेल्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पुरेश्या प्रमाणात पिण्याचे पाणी, औषधे साठा ठेवावा. रायगड वर येणाऱ्या महिला व पुरुष यांच्यासाठी पुरेश्या प्रमाणात स्वछता गृह उपलब्ध करून द्यावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

००००००

संबंधित पोस्ट

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

मसिहा फाउंडेशन तर्फे भगवान बाबा बालिकाश्रम बालगृहात अन्नदान वाटप…..आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम राबवला. 

vishwatmaklokswamivarta

आज,17 एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta