vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती..

सांगली, प्रतिनिधी : भारतातील रोजगार क्षेत्र झपाट्याने बदलत असून असंघटित क्षेत्राचे संघटित क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी शासन विविध धोरणांद्वारे प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे उद्योग, बँकिंग, उत्पादन, सेवा तसेच शासकीय क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे केवळ पदवी किंवा परीक्षेतील गुणांवर भर न देता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 2026 च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली येथे आयोजित या रोजगार मेळाव्यास पुणे विभागीय रोजगार मेळावे समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश चितळे, रोजगार मेळावा जिल्हा समन्वय समितीच्या अध्यक्षा काव्यश्री नलावडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, विमन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. लता देशपांडे, उपाध्यक्ष स्मिता केळकर, सचिव यशश्री आपटे, प्राचार्य अनिल सुगते, शिवाजी विद्यापीठ IQAC गुणवत्ता अधिकारी प्रा. सुभाष माने आदि उपस्थित होते. दुपारपर्यंत चाललेल्या या रोजगार मेळाव्यास आमदार सुधीर गाडगीळ यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले. रोजगार मेळाव्यात 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांकडून करण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने आयोजित या रोजगार मेळाव्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग-6, ऑटोमोबाईल-4, अभियांत्रिकी-4, बँकिंग व फायनान्स सर्व्हिसेस-4, सेल्स अँड सर्व्हिस-5, हॉस्पिटल-2, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स-3, इलेक्ट्रिकल्स-1 आणि फूड्स-2 अशा विविध क्षेत्रांतील एकूण 30 नामांकित आस्थापना/कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व कंपन्यांमार्फत एकूण 813 रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, आजचा रोजगार मेळावा हा केवळ नोकरी मिळविण्याचे व्यासपीठ नसून उद्योगविश्व समजून घेण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आहे. उमेदवारांनी केवळ आपल्या आवडीच्या कंपन्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विविध क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि उद्योगांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षण, इंटर्नशिप किंवा प्रोबेशन हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा असून त्या काळात मिळणारा अनुभव भविष्यात मोठी संधी निर्माण करतो, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात विशेष कौशल्य (Specialization) विकसित करणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल स्वीकारणारे आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे युवक-युवतीच भविष्यात यशस्वी ठरणार आहेत. बदलाला स्वीकारून स्वतःच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणाऱ्यांसाठी देशात रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. भारतातील युवा शक्ती ही देशाची मोठी ताकद असून तिचे कौशल्यात रूपांतर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

गिरीश चितळे यांनी युवकांना प्रेरणा देताना सांगितले की, आजच्या काळात केवळ रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बना. कौशल्य, आत्मविश्वास, नवकल्पना आणि उद्योजकीय वृत्ती यांच्या बळावर स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहे. शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार आणि उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्या. रोजगार देणारे युवकच विकसित भारताच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावतील.

यावेळी रोजगार मेळावा समन्वय समितीच्या अध्यक्ष काव्यश्री नलावडे यांनी मेळाव्याची माहिती दिली. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थांमधील रोजगार संधींची माहिती उमेदवारांना दिली. मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग घेतला. उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून थेट मुलाखती दिल्या. रोजगार मेळाव्यास एकूण 2 हजाराहून अधिक उमेदवारांनी उपस्थित राहून विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश, युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच उद्योग-शिक्षण समन्वयाचे महत्त्व विशद केले.

सूत्रसंचालन डॉ. वैशाली जोशी यांनी केले, तर आभार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरज देबाजे यांनी मानले. कार्यक्रमास विविध शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या कामाची पाहणी

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

नांदेडच्या एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणक्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेØ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षणØ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर