vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

 

 सांगली, प्रतिनिधी : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ व २०२५-२६ या २ वर्षाकरिता बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबा, द्राक्ष, केळी व डाळिंब या पिकाचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी काही ठिकाणी गारपीठ झालेली आहे. त्याअनुषंगाने ज्या ठिकाणी गारपीठ झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी गारपीठ या बाबीसाठी अतिरिक्त विमा संरक्षण घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची पूर्वसूचना 72 तासात विमा कंपनीला पुढीलप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 नुकसानीची पूर्वसूचना 72 तासात विमा कंपनीला ऑनलाइन पद्धतीने (1) https://pmfby.gov.in/krph/ – Krushi rakshak portal – farmer corner. (2) Crop insurance app द्वारे (DAC & FW). (3) PMFBY Whats app No. 7065514447 व (4) KRPH helpline – 14447 या पर्यायांचा वापर करून नोंदवावी, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

सिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

तालुका व गावपातळीवर आढावा घेऊन मान्सुन पूर्व तयारीचे आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*