vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला

 सांगली, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व हिंदुस्तान नायलॉन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुस्तान नायलॉन्स, सी-23, एमआयडीसी, मिरज येथे शुक्रवार, दिनांक 24 एप्रिल, 2026 रोजी, सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.  या रोजगार मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील हिंदुस्तान नायलॉन्स, मिरज यांच्याकडील व्हीएमसी /सीएनसी मशीन ऑपरेटर-10, टर्नर-10, फिटर-10, प्लास्टिक मोल्डर्स-10, हेल्पर्स -10 इत्यादी पदांसाठी तसेच बसाप्पा फुड्स, मिरज यांच्याकडील चीफ अकाऊटंट-1,फॅक्टरी सुपरवायझर-1, डीस्पॅच टीम -3, कॅशिअर-4, हाऊस किपिंग टीम-4, पि.आर.ओ-2 इत्यादी पदांसाठीची भरती आहे. अंदाजे पगार किमान 8 ते कमाल 25 हजारांपर्यंत आहे. यासाठी दहावी, बारावी, आय टी आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी सदर 2 उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी मेळाव्यास मुलाखतीस येताना आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी ०२३३ २९९०३८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन