vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

 

 राज्य प्रतिनिधी-      “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, खारघर जि.रायगड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

   श्री गुरु तेग बहादूर हे शिख धर्माचे 9 वे गुरू होते, त्यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा “गुरु ग्रंथ साहिब” यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी 17 व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.

  श्री गुरु तेग बहादूर यांचे सन 2025 हे 350 वे शहिदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता “हिंद-की- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 जून 2025 रोजी “हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समितीची याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता, राज्यस्तरीय समन्वय समिती, क्षेत्रीय आयोजन समिती व विविध कार्यक्रम आयोजन व्यवस्था समिती इ. समित्या दि. 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आल्या आहेत “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, खारघर जि. रायगड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे ठिकाण व त्यात समाविष्ट असलेले जिल्हे :-नांदेड – छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगावनागपूर – वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिमनवी मुंबई – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक      “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, खारघर जि. रायगड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती शीख-सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.      हिंद की चादर श्री. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता आवश्यक शिफारशी करण्यासाठी नांदेड, नागपूर व नवी मुंबई, खारघर जि. रायगड या 3 ठिकाणी क्षेत्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.        क्षेत्रीय आयोजन समितीची कार्यकक्षा :-नवी मुंबई, खारघर जि.रायगड या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता वेळोवेळी आढावा घेवून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक समिती तसेच आयोजन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करून त्यांची वेळोवेळी आढावा बैठक घेणे व त्याची माहिती राज्यस्तरीय समितीस व अल्पसंख्याक विकास विभागास सादर करणे.       या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, परिणामकारक अंमलबजावणी याकरिता आयोजन समन्वय समिती, व्हीआयपी व्यवस्थापन समिती, सभागृह व्यवस्थापन समिती, प्रशासन व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, बैठक व स्वागत व्यवस्थापन समिती, अतिथी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, नाव नोंदणी व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी व्यवस्थापन समिती, प्रचार व प्रसार व्यवस्थापन समिती, दक्षता व्यवस्थापन समिती, महिला सुरक्षा व्यवस्थापन समिती, आपात्कालीन व्यवस्थापन समिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन समित्ती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सार्वजनिक परिवहन व्यवस्थापन समिती, जूताघर व्यवस्थापन समिती, लंगर व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यकता असलेल्या समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करणे.   हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202510101859427814 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

                                                                                             मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी, रायगड

संबंधित पोस्ट

मुंबई ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा…

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण1 फेब्रुवारी 2026 रोजी आपला सलग नववा केंद्रीय बजेट संसदेत सकाळी 11 वाजता सादर करणार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

vishwatmaklokswamivarta

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

vishwatmaklokswamivarta