vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा- उद्योग मंत्री उदय सामंत

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : उद्योग विभाग ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी अर्थात एव्हीजीसी – एक्सआर धोरण आणत आहे. यामध्ये ॲनिमेशन, गेमिंगचे नवनवीन सॉफ्टवेअर निर्मिती, वेब सिरीज आदींचा समावेश असणार आहे. मुंबईत बॉलीवूड असल्याने चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. यासोबतच मराठी चित्रपट निर्मितीही राज्यात होते. या धोरणात मराठी चित्रपट निर्मितीबाबत स्वतंत्र कॅटेगिरी करून समावेश करण्यात यावा, अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या

   मंत्रालयात या प्रस्तावित धोरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत

     उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, हे धोरण सर्वंकष असावे. धोरणातून या क्षेत्रातील घटकांना सवलती देण्याबाबत दुरदृष्टीकोन ठेवण्यात यावा. राज्यात सातारा जिल्ह्यातील वाई आणि परीसरात मराठी चित्रपटांचे चित्रिकरणाचे ‘हब’ बनत आहे. तसेच भोजपूरी चित्रपटांचे चित्रीकरणही राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अशा बाबींचा समावेशही या धोरणात असावा.

    वेब सिरीजमध्ये काही स्वतंत्र विषय घेऊन केलेल्या असतात. त्यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण आदींचा समावेश असतो. अशा स्वतंत्र विषयाला वाहिलेल्या वेब सिरीज निर्मितीचा विषयवार या धोरणात सहभाग असावा, अशा सूचनाही मंत्री श्री.सामंत यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

कोल्ड प्ले काॅन्सर्ट’ हा ‘शून्य कचरा कार्यक्रम’ स्वरूपात साजरा होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७९ वी बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातूनयंत्रणांनी शाश्वत ग्रामविकास साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे, अभियानाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

vishwatmaklokswamivarta