vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७९ वी बैठक संपन्न

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न-महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७९ वी बैठक संपन्न..

मुंबई, प्रतिनिधी : “महाराष्ट्राची समृद्ध पर्यटन क्षमता, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसंपदेचा प्रभावी उपयोग करून राज्याला देश-विदेशातील पर्यटकांचे अग्रगण्य पर्यटनस्थळ बनविण्यासाठी पर्यटन विकासाला अधिक गती देण्यात येईल. पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासोबतच पर्यटनातून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर शासनाचा भर आहे,” असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७९ वी बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भा.प्र.से.), पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते

बैठकीत एमटीडीसीच्या ५० वर्षांच्या वाटचालीत पर्यटन विकासाला गती देताना दाजीपूर, औंढा-नागनाथ व लोणार येथील नवीन पर्यटक निवास, तसेच विविध रिसॉर्ट्सच्या आधुनिकीकरणाची कामे सुरू आहेत. गणपतीपुळे पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदविला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘यात्री निवास योजना’ प्रस्तावित असून, डिजिटल पर्यटनासाठी नवीन संकेतस्थळ, मोबाईल ॲप व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट कार्यान्वित करण्यात आला आहे

जल, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध महोत्सव व उपक्रम राबविण्यात येत असून, कोयना जलपर्यटन, पक्षी निरीक्षण, कासव संवर्धन आणि वन्यजीव सहलींवर भर देण्यात येत आहे. तसेच पीएम गतिशक्ती पोर्टलशी समाकलन, जबाबदार व शाश्वत पर्यटन, वैद्यकीय पर्यटन आणि ओटीएम २०२६ व ग्लोबल कोकण महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे देश-विदेशात प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे.

महामंडळाच्या प्रशासकीय, आर्थिक, मालमत्ता व्यवस्थापन आणि पर्यटन सुविधांशी संबंधित विविध विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. महामंडळाच्या पर्यटन सुविधा, आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या.

0000

 

 

संबंधित पोस्ट

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

कविता या स्त्रीलिंगी शब्दात मोठी ताकद : रोहिदास पोट

पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र मोबाईल व्हॅन सेवा 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत उपलब्ध

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश….

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन