vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत शाळांना भेटी; विद्यार्थ्यांशी संवाद

राज्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत शाळांना भेटी; विद्यार्थ्यांशी संवाद

नागपूर, प्रतिनिधी: येथील लालबहादूर शास्त्री हिंदी शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचा विकास करून त्या मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे. शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.

चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत मंत्री दादाजी भुसे यांनी हनुमान नगर येथील लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.शालेय गणवेशासाठी देण्यात येणाऱ्या निधीपैकी ८० टक्के निधी शाळांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधीही लवकरच वितरित केला जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासोबतच सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याची मागणी महापौर नीता ठाकरे यांनी केली. याबाबतचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावास नियमानुसार मान्यता देण्यात येईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत घेण्यात यावी. दर शनिवारी कवायतीचे आयोजन करावे तसेच एनसीसी आणि स्काऊटला शाळांमध्ये प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. कवायतीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिस्त विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे सर्व शाळांमध्ये कवायत नियमितपणे घेण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी शिक्षक भरतीमध्ये कला व क्रीडा शिक्षकांना प्राधान्य देण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील उमेदवार आणि माजी सैनिकांचाही समावेश करण्याबाबत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.शाळांच्या भिंतींवर महापुरुषांचे प्रेरणादायी विचार लिहावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. भेटीच्या प्रारंभी मंत्री दादाजी भुसे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली तसेच शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या.

लालबहादूर शास्त्री हिंदी शाळा ही नागपूर शहरातील मॉडेल शाळा असून येथे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेची सुविधाही उपलब्ध आहे, अशी माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी शिक्षक भरतीमध्ये कला व क्रीडा शिक्षकांना प्राधान्य देण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील उमेदवार आणि माजी सैनिकांचाही समावेश करण्याबाबत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.तत्पूर्वी मंत्री भुसे यांनी सावनेर तालुक्यातील चनकापूर येथील शाळेलाही भेट देऊन पाहणी केली.

००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे साकडे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना- पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी- पालकमंत्री शंभूराज देसाई

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…