vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर

राज्य प्रतिनिधी-महिलांना केवळ चूल आणि मूल या रहाटगाड्यातून बाहेर काढून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेले ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ (माविम) बुलढाणा जिल्ह्यात क्रांती घडवत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये १४ लोक संचालित साधन केंद्रांच्या (CMRC) माध्यमातून ‘माविम’चे जाळे पसरले असून, तब्बल ४,१८५ स्वयं सहाय्य बचत गटांच्या माध्यमातून ४२,०३९ महिलांना एकजूट करण्यात आले आहे.

आर्थिक सक्षमीकरणाचा भक्कम पाया : माविमच्या माध्यमातून महिलांना केवळ एकत्रच आणले नाही, तर त्यांना बँकांशी जोडून व्यवसायासाठी भांडवलही उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बँकांकडून महिला बचत गटांना २९२.३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, या महिलांचा कर्ज परतफेडीचा दर ९९ टक्के इतका प्रचंड असून, महिलांनी आर्थिक शिस्त आणि प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. हे कर्ज महिलांनी शेती, मुलांचे शिक्षण आणि विविध छोटे-मोठे उद्योग उभारण्यासाठी वापरले आहे. सन २०२५-२६ या वर्षात आतापर्यंत ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.

नवतेजस्विनी आणि तेजश्री योजनांचा लाभ : महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम’ राबविला जात आहे. तसेच, मानव विकास मिशन अंतर्गत ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस’ द्वारे गरीब महिलांना अत्यंत कमी व्याजदरात लघुकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे महिलांची खाजगी सावकारीतून सुटका झाली असून, २०१ गावांमधील ८,६९२ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

आरोग्य आणि स्वच्छता: Water.org सहभाग : केवळ आर्थिकच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यासाठीही माविम कटिबद्ध आहे. ‘Water.org’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यात १४ CMRC कार्यक्षेत्रात स्वच्छता आणि पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. यात शौचालय बांधणी आणि पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ११,२०० कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, महिलांच्या आरोग्यासाठी तपासणी शिबिरे घेऊन त्यांना ‘हेल्थ कार्ड’ देण्यात आले असून हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि BMI च्या नोंदी ठेवून आरोग्य सुधारण्यावर भर दिला जात आहे.अल्पसंख्याक महिलांचा विकास : मलकापूर शहरांमध्ये अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. मलकापूरमध्ये ३०,९१५ लोकसंख्येला लक्षित करून जैन, बौद्ध, मुस्लिम, पारशी व ख्रिश्चन समाजातील महिलांचे १८० बचत गट स्थापन करण्यात आले आहेत.

राजमाता’ विक्री केंद्रे आणि सेंद्रिय शेती : बचत गटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून ‘राजमाता’ कायमस्वरूपी विक्री केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. ही केंद्रे बस स्थानक व मुख्य बाजारपेठेत असल्याने महिलांच्या उत्पादनांना चांगली मागणी मिळत आहे. तसेच, घरगुती बागायतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बियाणे किट’ (Seed Kit) वाटप करून सेंद्रिय शेती आणि अन्नसुरक्षा बळकट केली जात आहे.

पुरुषांचा सहभाग: माविम मित्र मंडळ : महिला सक्षमीकरण केवळ महिलांपुरते मर्यादित न ठेवता, त्यात पुरुषांचाही सहभाग वाढविण्यासाठी ‘माविम मित्र मंडळ’ ही अनोखी संकल्पना राबविली जात आहे. यात ‘लिंगसमभाव संचेतना’ या विषयावर पुरुषांचे प्रबोधन करून त्यांना महिला विकासात सहभागी करून घेतले जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा समन्वय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि १४ लोक संचालित साधन केंद्रांच्या मदतीने ‘माविम’ हे महिलांच्या सर्वांगीण विकासाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे                                                                                          यासेरोद्दीन काझी,जिल्हा माहिती अधिकारी, बुलढाणा

 

संबंधित पोस्ट

प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

vishwatmaklokswamivarta

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta