vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर

मुंबई, प्रतिनिधी-

राज्याचे लोकायुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५३ वा वार्षिक अहवाल सादर केला.महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपायुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १२ पोटकलम (६) नुसार, २०२५ मधील लोकायुक्त व उपायुक्त यांच्या कामकाजासंबंधी हा अहवाल आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२५ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ८५४७ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्या पैकी ३८६९ तक्रारी स्वाक्षरी विरहित व इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या अर्जाच्या प्रति असल्यामुळे नोंदविण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे अहवालाधीन वर्षात ४६७८ नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. 

वर्षाच्या सुरुवातीला ४२८७ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे २०२५ मध्ये ८९६५ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली ४८८५ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि २०२५ च्या वर्षअखेरीस ४०८० प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून नमूद करण्यात आले.

 

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ८२.७१ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे-महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन 40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज