vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन..

राज्य प्रतिनिधी-भारत आता जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आ.हे आणि आसाम देखील देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे: आज संपूर्ण देश विकसित भारत घडवण्यासाठी एकजुटीने पुढे जात आहे; विशेषतः आपल्या तरुण नागरिकांसाठी, विकसित भारत हे एक स्वप्न आणि संकल्प दोन्ही आहे, हा संकल्प पूर्ण करण्यात ईशान्य भारताची महत्त्वाची भूमिका आहे:21 व्या शतकाची 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि या शतकाचा पुढील अध्याय पूर्व आणि ईशान्य भारताचा आहेः कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी भक्कम संपर्कव्यवस्था गरजेची आहे,आम्ही एम्सच्या जाळ्याचा विस्तार केला आहे आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये आहेत, विशेषतः आसाममध्ये पूर्णपणे कर्करोगावर उपचार करणारी रुग्णालये देखील स्थापन करण्यात आली आहेतः सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय स्वरुप बदलण्यासाठी घुसखोरीची कारस्थाने सुरू आहेत आणि यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्म

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दरांगच्या जनतेला आणि आसामच्या सर्व नागरिकांना आसामच्या विकासाच्या प्रवासातील या ऐतिहासिक दिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

 

पंतप्रधानांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, काल त्यांनी पहिल्यांदाच आसामला भेट दिली. त्यांनी या कारवाईच्या घवघवीत यशाचे श्रेय कामाख्या मातेच्या आशीर्वादाला दिले आणि तिच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्याबद्दल त्यांना आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी आसाममध्ये सुरू असलेल्या जन्माष्टमीच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छाही दिल्या. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यांनी जे शब्द उच्चारले त्यांचा पुनरुच्चार करत, मोदी म्हणाले की, त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात ‘सुदर्शन-चक्र’ची संकल्पना मांडली होती. त्यांनी मंगलदोई म्हणजे संस्कृती, ऐतिहासिक अभिमान आणि भविष्यासाठी आशा यांचा जिथे संगम होतो ते ठिकाण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा प्रदेश आसामच्या ओळखीचे एक मध्यवर्ती प्रतीक आहे. प्रेरणा आणि शौर्याने भरलेल्या या भूमीवर लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे धन्यतेची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली..

काही दिवसांपूर्वीच भारतरत्न आणि महान गायक भूपेन हजारिका यांची जयंती देशभरात साजरी झाली, अशी आठवण करून देत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांना काल त्यांच्या सन्मानार्थ आयोजित एका भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. आसामच्या अशा महान सुपुत्रांनी आणि आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्ने आता केंद्र आणि राज्य सरकारे अतिशय प्रामाणिकपणाने प्रत्यक्षात आणत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आसामच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, तसेच त्याचा जलद विकास, या केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांच्या प्राधान्यक्रमाच्या बाबी राहिल्या आहेत, यावर त्यांनी भर दिला. सरकार आणि आसामच्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, आज हे राज्य राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय प्रभाव पाडत आहे, असे ते म्हणाले

“भारत सध्या जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे, आणि आसाम देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे”, असे पंतप्रधानांनी म्हणाले. त्यांनी जुनी आठवण करून देत सांगितले की एक काळ असा होता जेव्हा आसाम विकासात मागे होता आणि देशाच्या इतर भागांच्या बरोबरीने चालण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत होता. मात्र, आज आसाम जवळजवळ 13 टक्के विकास दराने पुढे जात आहे. ही एक मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याचे श्रेय आसामच्या जनतेच्या कठोर परिश्रमांना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांना दिले. आसामचे लोक हे सहकार्य अधिक मजबूत करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. म्हणूनच, प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या टीमला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळतो, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतही आसामने ऐतिहासिक विजय मिळवून आपला आशीर्वाद दिला.

 

आसामला भारताच्या विकासाचे इंजिन बनवण्याच्या दृष्टीकोनातून आपले सरकार काम करत आहे, यांवर भर देत पंतप्रधानांनी आजचा कार्यक्रम हा त्याच वचनबद्धतेचा भाग असल्याचं नमूद केलं. “काही वेळापूर्वी , जवळपास ₹6,500 कोटी रुपये किंमतीच्या विकास प्रकल्पांचे याच मंचावरून उद्घाटन करण्यात आले” असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार आसामला सर्वांत उत्तम कनेक्टिव्हीटी असलेल्या राज्यांपैकी एक आणि आघाडीचे आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित करत आहे. “या प्रकल्पांमुळे आमचे संकल्प अधिक भक्कम होतील.” असे ते पुढे म्हणाले. मोदी यांनी दरांग वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, महामार्ग आणि रिंगरोड यांसाठी सर्वांचे अभिनंदन केले

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर