vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार…

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिनांक १३ सप्टेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागांसह इतर जिल्ह्यांत सुद्धा पावसाची तीव्रता जाणवणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवसांत पश्चिम-वायव्य दिशेने हे क्षेत्र सरकेल आणि परिणामी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढेल. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस शनिवारपासून सोमवारपर्यंत राज्यात राहण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तापमानात वाढ झाली आणि ऑक्टोबर हिटचा अनुभव अनेक जिल्ह्यांना आला. शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान एकोणतीस पूर्णनाक सात अंश सेल्सिअस राहिले, तर ठाणे आणि नवी मुंबईत पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. पावसामुळे तापमानात अजून घट होण्याची शक्यता असून पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे. नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

 मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक , तर रविवारपासून पावसाचा जोर अधिक वाढेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतही पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर घाट, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना यांसारख्या जिल्ह्यांत पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीसाठीही पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक!**धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश . अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट