vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन

निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन

यवतमाळ, प्रतिनिधी: जल, जंगल आणि जमिनीशी एकरूप झालेली संस्कृती, निसर्गालाच दैवत मानणारा निगर्वी भाव आणि खडतर जगण्यातही जपलेली स्वाभिमानाची परंपरा, अशा आदिम संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन. या औचित्यावर केवळ औपचारिकता न पाळता, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज, रविवारी बाभूळगाव गावात पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून पालकमंत्र्यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोलाच्या तालावर फेर धरला. यावेळी सत्ता आणि जनतेमधील अंतर दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोडावरील चावडीवर आदिवासी दैवतांचे दर्शन घेत त्यांनी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम, राणी दुर्गावती आणि वीर बापुराव शेडमाके यांसारख्या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केले. आपली बोलीभाषा, जल-जंगलावर आधारित जीवनशैली आणि निसर्गपूजक परंपरा ही मानवी संस्कृतीची खरी मुळे आहेत. तरुणांनी आपल्या कोलामी भाषेचा अभिमान बाळगत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेचे प्रभुत्वही मिळवावे, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

चावडीवर भरला जनता दरबार; प्रशासनाला थेट कृतीचे आदेशतालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन संपूर्ण दिवस आदिवासी बांधवांसोबत व्यतीत केला. शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून जमिनीवर बसून केलेला हा संवाद वंचित घटकाला आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा संवेदनशील उपक्रम ठरला.पालकमंत्र्यांनी चावडीवर गावकऱ्यांसोबत खाली बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कोलाम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रलंबित प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले. गावात सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी थेट बससेवा सुरू करणे, उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रे, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक भवन आणि स्मशानभूमी उभारणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महिला बचत गट आणि ग्रामसंघांना आर्थिक मदत देऊन स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी पोडावरील समस्यांच्या पाठपुराव्यासाठी विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास तहसीलदार मीरा पागोरे यांच्यासह पराग पिंगळे, हरिहर लिंगनवार, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सचिन महल्ले, नितीन पखाले, लोकेश इंगोले, दर्शना इंगोले आदींसह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गाडे यांनी केले, तर संचालन सुरेश चिंचोळकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाचं राज्यात आंदोलन.

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा