vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे-पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

मुंबई, प्रतिनिधी: नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्या सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात आहेत. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी विशेष सरकारी वकिलामार्फत संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री तटकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असून, प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा यासाठी सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनामार्फत कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक सहाय्य दिले जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

०००

संबंधित पोस्ट

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी !तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा ! जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक बोलवावी !

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta