vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी

लातूर, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आयोजित हा मेळावा लातूर जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या येथे होणार आहे.

या मेळाव्यामध्ये क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. (लातूर), श्रीराम फायनान्स लिमिटेड (लातूर), नीट लि. (पुणे) आणि पेटीएम (लातूर) यांसारख्या नामवंत आस्थापना सहभागी होणार असून त्या पुणे व लातूर येथील रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी १० वी, १२ वी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शाखेचे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. याव्यतिरिक्त, तरुणांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी मेळाव्यात ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ चा स्वतंत्र स्टॉल देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी १५ मे रोजी सकाळी १० वाजता स्वखर्चाने या मेळाव्याला उपस्थित राहावे. येताना शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यांच्या किमान तीन प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीस संलग्न गावे व शेतीला अपाय होणार नाही याची दक्षता घ्या-उद्योग मंत्री उदय सामंत..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

vishwatmaklokswamivarta

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta