vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील

 

जालना (प्रतिनिधी) : नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्यंत गंभीर अत्याचार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावून कठोर आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निकालाचे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने स्वागत केले असून, हा निर्णय बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवत सातत्याने पाठपुरावा केला. तपास यंत्रणा, महिला व बाल विकास विभाग, वैद्यकीय अधिकारी, सरकारी अभियोक्ता, साक्षीदार आणि संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने केलेल्या कार्यामुळे न्यायालयात भक्कम पुरावे सादर झाले आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळाली. या सर्व यंत्रणांचे आयोगाने विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. लाखेपाटील यांनी सांगितले की, बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वेळेवर तक्रार, संवेदनशील तपास, पुराव्यांचे शास्त्रशुद्ध संकलन आणि प्रभावी न्यायालयीन मांडणी किती महत्त्वाची असते, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. हा निकाल केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून, बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्यापासून कोणतीही सुटका नाही, असा स्पष्ट आणि कठोर संदेश देणारा आहे.

या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी अल्पावधीतच अत्यंत सबळ पुरावे गोळा करून न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे दोषारोपपत्र दाखल केले. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच हा निकाल शक्य झाला असून, त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही डॉ. लाखेपाटील यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांना बालकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. बालकांवरील कोणत्याही प्रकारचा अत्याचार, शोषण किंवा संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे. प्रत्येक बालक सुरक्षित, सन्मानजनक, भीतीमुक्त आणि बालस्नेही वातावरणात वाढावे, यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग कायम कटिबद्ध राहील, असा ठाम निर्धार डॉ. संजय लाखेपाटील यांनी व्यक्त केला.

चौकट,डॉ. संजय लाखेपाटील म्हणाले की, नसरापूर प्रकरणात महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने गुन्हा घडल्यानंतर प्रत्येक स्तरावर बारकाईने लक्ष ठेवून सातत्याने पाठपुरावा केला. न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा ही कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा असून, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, हीच अपेक्षा आहे. अशा कठोर शिक्षेमुळे बालकांवर अत्याचार करण्याचे धाडस करणारे नराधम गुन्हा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी अल्पावधीत सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात टिकणारे दोषारोपपत्र दाखल केले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि परिणामकारक कामगिरीबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.– डॉ. संजय लाखेपाटीलसदस्य, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, मुंबई

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक 

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना बेस्ट बसमधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!