vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचे काटेकोर नियोजन करावे – दीपेंद्र सिंह कुशवाह

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचे काटेकोर नियोजन करावे – दीपेंद्र सिंह कुशवाह

नाशिक, प्रतिनिधी: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 6 मे रोजी नाशिक मध्ये कुंभ उद्योग संगम व जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून आवश्यक पूर्वतयारी व काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश उद्योग विकास आयुक्त तथा उद्योग संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्त श्री. कुशवाह बोलत होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नाशिक चेतन पाटील, अहिल्यानगरचे दीपक शिवदास, नंदूरबारचे निलेश गायकवाड, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालक वैशाली सोने, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक पाटील, उद्योजकता विभागाचे व्यवस्थापक आर. एस. साखरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील, क्षेत्र अधिकारी मनीष महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.आयुक्त श्री. कुशवाह म्हणाले की, या परिषदेला राज्यातील मान्यवर मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी तसेच गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरळीत व प्रभावी होण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदाऱ्या स्पष्ट करून वेळेत काम पूर्ण करावे, कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग सुविधा, प्रवेश नियंत्रण, नोंदणी व्यवस्था तसेच व्हीआयपी हालचालींसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात यावे. यासाठी पोलीस विभाग, वाहतूक शाखा व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तांत्रिक व्यवस्था, सादरीकरणासाठी आवश्यक उपकरणे, ध्वनी व दृश्य प्रणाली, मीडिया समन्वय, स्वागत कक्ष व मार्गदर्शन व्यवस्था सक्षम ठेवावी. येणाऱ्या उद्योग प्रतिनिधी व गुंतवणूकदारांसाठी सुलभ नोंदणी, माहिती केंद्र, मार्गदर्शक कर्मचारी व हेल्पडेस्क उपलब्ध करून द्यावा.

गुंतवणूक परिषद नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असून, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे सर्व यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नवउद्योजक व उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदार यांना याबाबत कळविण्यात येवून सहभागासाठी उद्युक्त करावे. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या प्राधान्याने पार पाडून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले. या परिषदेद्वारे नाशिकला औद्योगिक नकाशावर अधिक ठळक स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने गुंतवणूकदारांना जिल्ह्यात गुंतवणूकीसाठी मोठी संधी निर्माण होणार असल्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले तर जिल्ह्यातील वातावरण उद्योगस्नेही असल्याने भविष्यात उद्योग आणि गुंतवणूकदारांचा ओघ नाशिकमध्ये वाढणार असून यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

मुंबईकरांसाठी बातमी: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक – पर्यायी व्यवस्था वेळापत्रक माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न*’रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती*भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..