vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. “देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशीप” या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे.

मॅगझिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून देश–विदेशातील मोठ्या वाचकवर्गात ती पोहोचली आहे. अभ्यासू, धडाडीच्या आणि लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन या विभागांत मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा या मुलाखतीत मांडण्यात आला आहे.मॅगझिनच्या संपादिका अँड्रिया कोस्टबीर यांनी ही विशेष मुलाखत घेतली असून मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रवासातील विविध टप्पे व पैलू आकर्षक छायाचित्रांसह सादर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतीही या अंकात समाविष्ट आहेत.

स्पेशल एडिशनचे प्रकाशन रामटेक निवासस्थानी,शनिवारी संपादिका अँड्रिया कोस्टबीर आणि अशोक धामणकर यांनी रामटेक येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रवासाची झलक या अंकातून वाचकांसमोर येत आहे, ती नक्की वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.

 

000

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी*  *सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना.* 

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; 8 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणापहिल्या औद्योगिक शिखर परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद; एमएमएलपी, ड्राय पोर्टमुळे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणीची क्षमता अधोरेखित

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे– महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*