vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने शोककळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन,दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने शोककळा

नागपूर, प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नागपूरमधील खामला येथील मेघे निवासस्थानी जाऊन दत्ताभाऊ मेघे यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.दत्ताभाऊ मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर समाजासाठी कार्य करणाऱ्या या लोकनेत्याच्या निधनाने मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

०००

संबंधित पोस्ट

गुणवत्तापूर्ण कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

vishwatmaklokswamivarta

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*