vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

मुंबई, प्रतिनिधी : हिमोफिलीया रुग्णांचे ऑनलाईन पोर्टल द्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचाराची अद्ययावत नोंद ठेवावी तसेच एका महिन्याच्या आत हिमोफिलीयासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील हिमोफिलीया रुग्णांवरील उपचारासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालाय मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी गुजरात, जम्मू काश्मीर, केरळ, कर्नाटक यासह इतर राज्यात हिमोफिलीया संदर्भात राबविण्यात येत असलेल्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या पीआयपी वार्षिक कार्यक्रम कृती आराखड्यात हिमोफिलीया आजारासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

राज्यात हिमोफिलीया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, राज्यात एकूण ५ हजार ४९७ हिमोफिलीया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आजाराचे कमी तीव्र, मध्यम तीव्र आणि तीव्र असे वर्गीकरण असून, मध्यम व तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. या रुग्णांना तातडीने निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सामाईक डे-केअर सेंटर अद्यावत करावीत. तसेच रुग्णांचा डाटा एकत्रित करून या आजाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा गिरीश खापरे, आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच हिमोफिलिया सोसायटी या संस्थेचे प्रतिनिधी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.00

संबंधित पोस्ट

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला धूळ चारत भारतानं पटकावलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद, पाच गडी राखून भारताचा दणदणीत विजय

vishwatmaklokswamivarta

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारातील संभाव्य अनियमिततेबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विशेष उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी मेदांता रुग्णालयात उपोषण सोडले.