vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन-२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी..

मुंबई,  : राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला “150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन, वेळबद्ध सेवा, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात पदांना मान्यता, दोन वसतीगृहे आणिस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा !*

vishwatmaklokswamivarta

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे साकडे

vishwatmaklokswamivarta