vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन; मार्गदर्शक सूचना जारी

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन;

मार्गदर्शक सूचना जारी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिध

प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जनार्दन विधाते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

सुरक्षेचे उपाययोजना ,तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सावधगिरीच्या सूचना,  चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला (@SDMAMaharashtra) भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्यामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा..चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

रेलवन ॲपचे उद्घाटन : सर्व प्रवासी सेवांसाठी एक-थांबा उपाय

विकसित कृषी संकल्प यात्रा’शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करणार

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता -घरो घरी तिरंगा मोहीमेंतर्गत नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे उत्साही आयोजन,तिरंग्यासोबत सेल्फी घेऊन www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन