vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर विद्यार्थी, नागरिकानी स्पर्धेत ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर विद्यार्थी, नागरिकानी स्पर्धेत ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर निबंध सादरीकरण करावयाचे आहे.

निबंध PDF स्वरूपात   https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि महापुरुषांचे विचार तरुण पिढीमध्ये रुजवणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.आहे, स्पर्धकांना दिलेला निबंध ऑनलाइन लिंकद्वारे सादर करावा लागणार आहे.स्पर्धा दोन गटांत विभागली असून, दोन्ही गटांसाठी शब्दमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.गट १ (विद्यार्थी गट) आयटीआय (ITI), डिप्लोमा, बायफोकल आणि MCVC चे विद्यार्थी. ५०० ते ८०० शब्द.गट २ (खुला गट) राज्यातील सर्व पुरुष व महिला नागरिक यांच्यासाठी शब्दमर्यादा ८०० ते १२०० शब्द आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासनाने दिलेल्या अधिकृत लिंकचा वापर करावा. अधिक माहितीसाठी स्थानिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

स्पर्धेतील विजेते यांना प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र द्वितीय २१हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तर तृतीय पारितोषिक ११, हजार रुपये ,स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र असे असणार आहे.निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे.निबंध मूळ (Original) असावा, कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर योग्य आणि सुसंस्कृत असावा.

निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल.मात्र अंतिम सादरीकरण PDF स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा.स्पर्धकांनी माहिती आवश्य भरावी यात पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, ITI/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता असावा. सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.

संबंधित पोस्ट

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या –

vishwatmaklokswamivarta

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

साखर गावातील घटनेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही- गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी