vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी –  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई  : – ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, “दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली झाली. एक अनुभवी संसदपटू आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दिग्गज नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दत्ताजी मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

000000

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

विदर्भ , मराठवाडा, तेलंगलना आणि आंध्रप्रदेश या ठिकाणांना एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती -अकोला- तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta