vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिवस म्हणून साजरा महा वॉकेथॉन २०२६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रथम क्रमांक

माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिवस म्हणून साजरा महा वॉकेथॉन २०२६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रथम क्रमांक

जालना : प्रतिनिधी- मृद व जलसंधारण विभाग, जालना यांच्या वतीने जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महा वॉकेथॉन २०२६ स्पर्धेत अंबड तालुक्यातील समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धाकलगाव यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

संस्थेला प्रथम क्रमांकासाठी रोख ११,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हे पारितोषिक जिल्हाधिकारी मा. सौ. अशीमा मित्तल महापौर वंदनाताई मगरे मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता सलगर मॅडम यांच्या हस्ते संस्थेचे कोषाध्यक्ष राजू भाऊराव राठोड यांनी स्वीकारले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन पालवे, सचिव सतीश मुसळे, तसेच संस्थेचे राम खाडे,विक्रम चव्हाण, किरण सातव, राहुल डोईफोडे, मंगेश घुगे, जयंत कायंदे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मृद व जलसंधारण, पर्यावरण संवर्धन तसेच जलसंधारणाच्या कार्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या वॉकेथॉनमध्ये संस्थेने उत्स्फूर्त सहभाग घेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या यशामुळे धाकलगाव व अंबड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संबंधित पोस्ट

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्याजागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच :- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानांचा 21 सप्टेंबरला ई-लिलाव

vishwatmaklokswamivarta

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta