vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा– आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके,वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय…

आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा– आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके,वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय…

मुंबई, प्रतिनिधी : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात 490 शासकीय वसतिगृहे चालविण्यात येतात. या वसतिगृहांमध्ये राहून दरवर्षी सुमारे 58 ते 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने शासनाने 14 ऑगस्ट 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका विभागाने घेतली असल्याचे आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले.

मंत्री उईके म्हटले की, वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा किमान 30 वर्षे असावी, या मागणीच्या अनुषंगानेही सकारात्मक विचार करण्यात आला आहे. यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे वयाची 30 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सहकार्य करणार आहे. पीएच.डी., एम.फिल., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण तसेच इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही, तर त्यांना ‘स्वयम’ योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेने पाहत असून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने सकारात्मक आणि न्याय्य मार्ग काढण्याची शासनाची भूमिका आहे. असेही आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.

00000

संबंधित पोस्ट

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य-युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी अशोक काकडे

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta