vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशव्यवसाय

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

विशेष लेख -उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना

राज्य प्रतिनिधी-कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. काय आहे ही योजना.. जाणून घेवू या लेखातून…

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) व दोन उपकंपने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाची स्थापना केली आहे.

समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता रु. 1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व 25 टक्के बीज भांडवल योजना या योजना ऑफलाईन अर्ज आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना योजना (रु. 15 लाख) व गट कर्ज व्याज परतावा (रु. 10 लाख)आहे.

रु. 1.00 लक्ष थेट कर्ज योजना : लाभार्थीना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु. 2085.

25 टक्के बीज भांडवल योजना :- कर्जाची उच्चतम मर्यादा रु. 5 लक्ष पर्यंत. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 50 वर्ष आहे. बँकेमार्फत लाभार्थींना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 25 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाच्या रक्कमेवर व्याजाचा दर 4 टक्के असतो.

या योजनांसाठी लागणारी सर्वसाधारण कागदपत्रे :- पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (विजाभज व वि.म.प्र), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनांकरीता महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 15 लक्ष पर्यंत) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. 15लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, महामंडळाच्या www.vjnt.org, या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जातात.

गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत) :- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गतील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाते.

या योजनेमध्ये बँकेने रु. 10 लक्ष ते रु. 50 लक्ष पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूरी केलेल्या अर्जदाराने कर्जाचे मासिक हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम ( 12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. (जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या किंवा रु.15.00 लाखाच्या मर्यादेत) कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 45 वर्षे आहे. अर्जदारांने अर्ज करण्यासाठी सर्व सभासद हे विजाभज व वि.म.प्रवर्गातील असावी. महामंडळाच्या www.vjnt.org या वेबपोर्टलद्रवारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जातात.

या योजनांसाठी लगणारी सर्व साधारण कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला, (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लाख), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचा दाखला ( विजाभज व वि.म.प्र), दरपत्रक ( कोटेशन), आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या बँक पासबुक, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे दाखला/जन्म तारखेचा दाखला, व्यवसायचे कोटेशन लागते.

इच्छुक, गरजु विजाभज व वि. म.प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय: श्री राम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क्र. 01, तळमजला, मारुती मंदिरामागे, चेंढरे अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड, दूरध्वनी क्र. 02141-221307, Email – vnvintdcraigad3@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी कळविले आहे.जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

जवाहर नवोदय विद्यालय; 18 जानेवारीला निवड चाचणी परीक्षा· परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 30 सप्टेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील